सध्याच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या आयुष्यात खाणं-पिण्यावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्या खाण्याचा-पिण्याचा परिणाम सेक्स लाईफवर होत असतो. अनेकदा रात्रीच्या सुमारास काहीजण अशा काही गोष्टी खातात ज्याचा परिणाम त्यांच्या सेक्स लाईफवर म्हणजेच शारीरिक संबंध ठेवताना होतो. अनेकदा असे काही पदार्थ असतात जे खाल्ल्यामुळे तुमच्या पार्टनरचा मुड खराब होतो. पाहूयात कोणते आहेत हे पदार्थ...
- खूप जास्त सॉल्टी
- फ्रेंच फ्राईज, पॉपकॉर्न यांसारख्या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण हे सामान्यपेक्षा अधिक असते. मीठाचा अतिरेक झाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे पोटात मळमळ होण्यास सुरुवात होते. जास्त प्रमाणात मीठाचं सेवन हे उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरु शकतं. या सर्वांचा परिणाम तुमच्या सेक्सुअल लाईफवर होतो.
- कॉफी
आपल्या शरीरात एक हार्मोन आहे - कॉर्टिसॉल, ज्यामुळे आपला ताण वाढतो. कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे हे हार्मोन वाढतं. कॅफिन हे तुमची कामुकता कमी करतं त्यामुळे जेवल्यानंतर कॉफी पिण्याची सवय सोडून द्या. - मद्यपान
अनेकांना असे वाटतं की, बिअर किंवा वाईन पिल्यास आपल्या जोडीदाराला रोमॅन्टिंक बनवेल. पण तसं काहीही नसतं. अल्कोहोल घेतल्यानंतर झोप देखील येऊ शकते. बिअर किंवा वाईनमुळे शरीरात नेलाटॉनिन वाढते जो स्लीप हार्मोन आहे. यामुळे तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. - सोया
पुरुष असो किंवा महिला, शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी चांगली असणं आवश्यक असतं. सोया शरीरातील हार्मोन्सला असंतुलित करू शकतो. वैद्यकीय संशोधनात असे सुचवण्यात आले आहे की, जर पुरुष दिवसातून १२० मिलीग्रॅमपेक्षा जास्त सोयाचे सेवन करतात तर त्यांचे टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होते. म्हणून सेक्स करण्यापूर्वी ते न खाण्याचा सल्ला दिला जातो. - गॅस वाढवतील अशा भाज्या
जेवल्यानंतर अनेकांना पोटात दुखण्याची समस्या जाणवते. चुकीच्या खाण्यामुळे गॅस सारख्या समस्या लैंगिक संबंधात अडथळा आणतात. फ्लॉवर, स्पाउट्स सारख्या भाज्या मिथेन तयार करतात. म्हणजेच जर या भाच्या खायच्या असतील तर त्या फार चांगले शिजवणे आवश्यक आहे. जेणेकरुन गॅसचा त्रास जाणवणार नाही आणि तुमची सेक्स लाईफ उत्तम चालेल
Comments
Post a Comment